समज मनाची

 ___समज मनाची__


समजावतोय खूप मी

रोज माझ्याच मनाला

चूक तर तूच केलीस

दोष तिला देतो कशाला


तूच तेव्हा घाबरलास

तिच्यासमोर बोलायला

मनातलं गुपित तेव्हा

तिच्यासमोर खोलायला


ती काही जोतिषी नव्हती

मनातलं तुझ्या जानायला

तूच धाडस करायचं होतं

तुझं प्रेम व्यक्त करायला


वेळ आता निघून गेली

लग्न ती करून गेली

तू बसला विचार करत

ती माझी का नाही झाली


सुखी आहे ती आता

तिच्या संसारात मग्न

नको आणू आता तिच्या

भरल्या संसारात विघ्न


दिसली जरी चुकून कुठे

जवळ तिच्या जाऊ नको

करत होता प्रेम तिच्यावर

कबुली याची देऊ नको


विसरून जा भूतकाळ तो

जो तिलाही माहीत नाही

यातच भलं आहे दोघांचंही

दुसरा कुठलाच मार्ग नाही


      सिताराम कांबळे

      ८६५२७५९९२८

Comments

Popular posts from this blog

आदिवासी साहित्य सूची

डॉ. गोविंद गारे यांच्याविषयी.....

हुतात्मा नाग्या महादू कातकरी