खेडेगाव

Related image
डोंगर दऱ्या कडे कपारी
आमच्यासाठी वैभव भारी
राहतो आम्ही रानामधी
रानमेव्याची गोडीच न्यारी

येऊन बघा आमच्या गावात
भटकंतीला कराल सुरुवात
आमच्या गावच सौदर्य पाहून
खूष व्हाल मनातल्या मनात

सभोवताली डोंगर आणि
मध्ये वासलाय आमचा गाव
डोंगर आणि झाडा आडून
नाही दिसणार दुसरा गाव

झाडा झुडपातील नागमोडी वाट
मध्येच लागतो छोटासा घाट
चालायलाही वाटते मजा
रानपाखरांचा वेगळाच कीलकीलात

स्वागत करतात रानपाखरे
त्यांच्याच गोड आवाजात
म्हणून म्हणतोय येऊन बघा
एकदा आमच्या खेडे गावात

 सिताराम कांबळे

Comments

Post a Comment