बीजमाता

बीजमाता


आकोले तालुक्यात आहे कोंभाळने गाव
येथे आहे बिजमाता तीचं राहीबाई नाव

गावरान बियाणांची तिनं केली साठवन
एकशे सोळा बियाणांचे तिने सांभाळले वान

देते पटवून महत्व गावठी बियानांचं छान
नाही होणार आजार वापरा गावठी बियानं

पोटच्या पोरावानी तिने जपली बियानं
सह्याद्रीच्या मातीतली जनु सोन्याची ही खान

रानभाज्या रानातल्या तिने आणल्या शेतात
गावठी बियाणांची बँक तिने खोलली घरात

गावठी बियान जपायचं काम घेतलं हातात
आकोले तालुक्याचं नाव पोचलं जगात

शेतकऱ्याची ही लेक झाली बँकेची मालकीण
साऱ्या राज्यातली लोकं भेट देतात आवडीनं

आभिमानाने सांगतो आहे थोर ही माऊली
गावरान बियाणांना देते मायेची साऊली

                सिताराम कांबळे

Comments