_____सह्याद्रीवीर____
सह्याद्रीच्या रांगेमध्ये आहे देवगाव
साऱ्या जगामध्ये गाजू लागलं राघोजीचं नाव
इंग्रजांच्या सत्तेचा मोडला रे कणा
जाणून घेऊ या त्याचा इतिहास जुना
वैऱ्यांच्या त्या मानेवरी घातला रे घाव
साऱ्या जगामध्ये गाजू लागलं राघोजीचं नाव
जुलमी इंग्रज सत्तेला दिली नाही दाद
सावकार शाहीला त्याने केलं बरबाद
आन्याय आत्याचाराचं पुसून टाकलं नाव
साऱ्या जगामध्ये गाजू लागलं राघोजीेचं नाव
बंडकरी घेऊन संग घातलं थैमान
लढाईला निवडलं सह्याद्री मैदान
राघोजीची ताकत तेव्हा नव्हती त्यांना ठाव
साऱ्या जगामध्ये गाजू लागलं राघोजीचं नाव
राघोजीची ताकत आता कळाली जगाला
करू या वंदन सह्याद्रीच्या या वीराला
केला नाही त्याने कसलाही भेदभाव
साऱ्या जगामध्ये गाजू लागलं राघोजीचं नाव
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment