___आदिवासी रत्न_____
आमची आदिवासींची शान
ठका बाबाला देऊ मान
त्या उडदावने गावात
एक मिळालं रत्न छान
त्याने निसर्ग मित्राची
भूमिका वठवली छान
त्याच्या महान कलेचा
आहे आम्हाला आभिमान
त्याचा आवाज ऐकुन
प्राणी पक्षी होतात गोळा
त्याच्या आजूबाजूला
भरतो प्राणी पक्षांचा मेळा
आमचा हा महान कलाकार
राष्ट्रपती पदकाने झाला सत्कार
पण आजही त्याच्या जीवनात
गरीबीचाच काळा आंधार
सरकारला तर पडलाय विसर
पण समाजाचही नाही लक्ष
हा महान कलाकार मात्र
समाजासाठी नेहमीच दक्ष
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment