____पाऊस___
आला पाऊस पाऊस
झालं चोहीकडे पाणी
चला खेळू पावसात
गाऊ पाऊसाची गाणी
करू होड्या कागदाच्या
देऊ सोडून पाण्यात
जातील डुलत डुलत
दूर खोल समुद्रात
आई बाबा सांगतात
नका खेळू पावसात
रान पाखरही आता
जाऊन लपली झाडात
गायी वासरं रानात
घेई झाडाचा आसरा
शेळ्या गेल्या गारठून
झाला गार गार वारा
लागता पावसाची चाहूल
बेडुकरावं खूष झाला
उड्या मारीत मारीत
मातीतूनी वर आला
ओढे भरले तुडुंब
वाहू लागले भरून
गेले नदीला भेटाया
दूर डोंगरावरून
ओढे पोटात घेऊन
नदी वाहे झुळू झुळु
सांगे ओढ्याच्या कानात
जाऊन समुद्राशी खेळू
सिताराम कांबळे
Best moments
ReplyDelete