क्रांतिवीर







_____क्रांतीवीर____
आम्ही विसरलो नाही क्रांतीविरांच्या कार्याला 
आम्ही करतो वंदन तंट्या राघोजी बीरसाला |ध्रु|

त्या इंग्रज सत्तेचा कणा टाकला मोडून
जुलूम इंग्रज सैन्याचे यांनी टाकले गाडून
इंग्रजांच्या जाचातून केले मुक्त आम्हाला
आम्ही करतो वंदन तंट्या राघोजी बीरसाला|१|

लढले डोंगर दऱ्यातून हाती तिरकामठा घेऊन
कधी काढल्या बंदुका पुढे शत्रूला पाहून
त्यांनी पाठवले माघारी त्या इंग्रज सैन्याला
आम्ही करतो वंदन तंट्या राघोजी बिरसाला|२|

आदिवासी जनतेला त्यांनी आणले एकत्र
त्यांनी मशाली क्रांतीच्या पेटवल्या सर्वत्र
त्यांनी लावला सुरुंग त्या इंग्रज सत्तेला
आम्ही करतो वंदन तंट्या राघोजी बीरसाला|३|

आमच्या राघोजीचे बंड झाले इंग्रज थंड
उलगुलान बीरसाचं झाले इंग्रज हैराण
इंग्रज घाबरले नेहमी त्या तंटया मामाला
आम्ही करतो वंदन तंटया राघोजी बीरसाला|४|

              सिताराम कांबळे

Comments