_____कळसुआईचं गाणं_____
कळसुबाई आमची आई बसलेय डोंगरावर
आहे सर्वांगीन सुंदर आमच्या आईचं मंदिर |ध्रु |
चला चालत वरती जाऊ
दर्शन कुळसाईचं घेऊ
बारीचा घाट आवघड वाट चढून जाऊ वर
आहे सर्वांगीन सुंदर आमच्या आईचं मंदिर |१|
आई बसलेय डोंगरावर
तीचं लक्ष भक्तांवर
महाराष्ट्रातील सर्वात उंच आईचं शिखर
आहे सर्वांगीन सुंदर आमच्या आईचं मंदिर|२|
घेऊ आईला साडी चोळी
आहे भक्ती आमची भोळी
आईवरची श्रध्दा आमची राहील आयुष्यभर
आहे सर्वांगीन सुंदर आमच्या आईचं मंदिर |३|
आई महाराष्ट्राची शान
पहिला तिलाच देऊ मान
चोळीचा खन आईचा मान देऊ तिला सत्वर
आहे सर्वांगीन सुंदर आमच्या आईचं मंदिर |४|
सिताराम कांबळे
मस्त
ReplyDelete