____आपली संस्कृती____
महान आहे जमात आपली
महान आपली संस्कृती
आदिवासी येतात एकत्र तेव्हा
आभिमानाने फुगते छाती
रहातो जरी झोपडीत आम्ही
स्वाभिमानाने जगतो आम्ही
आभीमानाने सांगतो आम्ही
रानातले आदिवासी आम्ही
डोंगर दऱ्या आहेत साथीला
वन्य प्राणीही मित्र आमचे
खेळायला येतात आमच्या आंगणात
आंगणच खेळाचे मैदान त्यांचे
महान आमच्या चालीरीती
आजूनही जपून ठेवल्यात आम्ही
आजूनही सामाजिक कार्यात
आदिवासी गाणी गातो आम्ही
जपून ठेऊ आपली संस्कृती
जपून ठेऊ चाली रिती
जपून ठेऊ स्वाभिमान आपला
जपून ठेऊ निसर्ग संपत्ती
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment