___मागे वळून बघा___
मरायला तर सर्वच आलेत
पण एक गोष्ट नक्की करा
समाजासाठी,गावांसाठी
काहीतरी करून मरा
फक्त नोकरी आणि कुटुंब
एवढेच बघत बसू नका
समाजाचे देणे लागतोय
हे तर कधीच विसरू नका
शाळा शिकुन मोठे झालात
गावाकडे एकदा वळून बघा
उपाशी मारतात आपलेच बांधव
त्यांना मदतीचा हात द्या
गरज आहे समाजाला तुमची
परक्यासारखे वागू नका
समाजामुळे आपण आहेत
हे तर कधीच विसरू नका
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment