_निसर्ग संपत्ती____
आमचा आकोले तालुका
लय वैभव त्याचं भारी
कोकण कड्याच्या शेजारी
दिसते शोभून सांदन दरी
राज्यातील सर्वात उंच
कळसुआईचं शिखर
दिसतं त्याच्यावर शोभून
कळसुआईचं मंदिर
भंडारदऱ्याचं धरण
आमच्या तालुक्याची शान
या पाण्यानं भागते
अावघ्या महाराष्ट्राची तहान
पर्यटकांचं आकर्षण
आमचा रंध्याचा धबधबा
पाहुण्यांच्या सेवेसाठी
आहे डौलामधी उभा
असा आकोले तालुका
किती सांगावी महती
जपली पाहिजे आपण
आपली ही निसर्ग संपत्ती
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment