___सह्याद्री हिरा___
रानावनात राहून
ज्योत क्रांतीची लाऊन
आमच्या सह्याद्री वाघानं
इतिहास घडवला राघुनं
जुल्मी इंग्रज सावकार
तेव्हा माजले होते फार
डोंगर दऱ्यात राहून
इतिहास घडवला राघुनं
राघोजीला आला राग
लावली क्रांतीची आग
काढले इंग्रज भाजून
इतिहास घडवला राघूनं
होते विचार त्याचे भारी
होता गरीबांचा कैवारी
जुल्मी सावकार ठेचून
इतिहास घडवला राघुनं
सह्याद्रीच्या मातीतून
हिरा गेला तो चमकुन
इंग्रज सैन्याशी लढून
इतिहास घडवला राघुनं
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment