____मरणघाट____
मेळघाट की मरणघाट
समजत नाही कोणता घाट
कोणताही असला घाट तरी
आदिवासींची लावली वाट
सरकारचं हे चुकीचं धोरण
आदिवासींचं झालय मरण
नाही कुठलं त्यांना संरक्षण
जबरदस्तीचं विस्थापण
सरकार आणि वनविभाग
यांचाच नाही ताळमेळ
आदिवासींवर मात्र आलेय
तीव्र लढा देण्याची वेळ
प्रशासनाच्या अासून चुका
दोष मात्र आदिवासीला
आता जर शांत बसलो तर
आपण लागू देशोधडीला
आदिवासी झाले नक्षलवादी
आसा सुर निघतोय आज
चहूबाजूने कोंडी झालेय
कसा वाचणार आपला समाज
आस्थित्वाचा प्रश्न आहे
लढा तर दिलाच पाहिजे
सर्व आदिवासी एक होऊन
ताकत आपली दावली पाहिजे
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment