_____मोठी समस्या____
आमच्यासाठी कष्ट करून
आमचे आईवडील थकले
रोज कष्ट करून करून
त्यांचे रक्त मात्र आटले
उच्च शिक्षण घेण्यासाठी
शहरात आम्हाला पाठवलं
शिक्षण आमचं व्हावं म्हणून
शेतात स्वताला राबवलं
भरमसाठ कॉलेजची फी
आणि जीवघेणी स्पर्धा
यालाच तोंड देता देता
आमचा जीव जातो आर्धा
आपली मुलं शिकावी म्हणून
पालक होतात कर्जबाजारी
गरीब बिचाऱ्या मुलांसाठी
शिक्षण व्यास्था वाटतेय आजारी
शिषावृतीचा असतो आधार
ती पण नाही वेळेवर मिळत
शिक्षणापासून दूर जातात
गरीब मुलं कळत नकळत
आशीच जर आवस्थसा राहिली
आदिवासी मुलं शिकणार कशी
शिक्षणावीना मुलं आमची
स्पर्धा कशी करणार जगाशी
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment