_____गैरसोय_____
गरीब दुबळा आदिवासी समाज
खेड्यापाड्यात रहातोय आज
उच्च शिक्षणाची नसते सोय
कसा मिळणार शिक्षणाचा ताज
रहातो आम्ही खेडेगावात
शिकायला जातो दूर शहरात
आईवडील गरीब आमचे
खर्चीला नाही पोचत हात
येण्या जाण्याची नसते सोय
आसातो फक्त हॉस्टेलचा आधार
तिथेही प्रवेश मिळवण्यासाठी
होते आमची मारामार
सेवा सुविधांचा नेहमीच अभाव
कधी वाटतं बरा आमचा गाव
जेवण सुध्दा नसतं वेळेवर
कसा लागणार आमचा टिकाव
आदिवासी मुलं शिकण्यासाठी
होस्टेलची सोय चांगली असावी
कोणत्याही नवीन योजनेसाठी
भ्रष्टाचाराची कीड नसावी
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment