_____आतुट नातं____
मी आदिवासी गर्व आदिवासी
आम्ही सर्व आदिवासी
दऱ्या खोऱ्यात रहातो आम्ही
एकरूप आहोत निसर्गाशी
पशु पक्षी आमचे सोबती
झाडे झुडपे आमचे साथी
आमचं एक वेगळच नातं
नवीन नाही आमच्यासाठी
निसर्गावर जगतो आम्ही
तोच आमची माय माऊली
निसर्गच दैवत आमच्यासाठी
डोईवर आहे त्याची सावली
निसर्ग आणि आदिवासी
यांचं एक आतुट नातं
वर्षानुवर्ष टिकून आहे
कधीही न तुटणार नातं
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment