__आम्ही आदिवासी__
आदिवासी आहोत आम्ही
समजू नका वनवासी
आदिवासींची पोरं आम्ही
खेळतो जिवंत वाघाशी
जल जंगल जमीन
ही तर आमची संपत्ती
आमच्याच गावात येऊन तुम्ही
खेळू नका आमच्याशी कुस्ती
डाव तुमचा पलटेल आता
आम्ही आता सावध झालोय
जंगल सोडून आम्ही आता
कुस्तीच्या आखाड्यात आलोय
समजू नका आम्हाला कमजोर
लढू शकतो समोरासमोर
जेव्हा उतरू आम्ही मैदानात
तुमच्याही जीवाला लागेल घोर
तुमचे काळे डाव आता
आमच्या पण लक्षात आलेत
सावध रहा तुम्ही आता
आदिवासी जागे झालेत
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment