____राघोजीचं बंड_____
राघोजी भांगरेचं पाहून बंड
इंग्रज सरकार पडलं थंड
आदिवासींच्या कल्याणासाठी राघोजी
आवतरला
माझ्या राघोजी भांगरेची कीर्ती लागलेय पसरायला|ध्रु|
बाडगीची माची त्याचा ठिकाणा
इंग्रज सत्तेचा मोडला कणा
पाच हजाराचं बक्षीस लावलं रागोजी पकडायला
माझ्या राघोजी भांगरेची कीर्ती लागली पसरायला|१|
सह्याद्रीचा डोंगर भाग
त्यात जन्मला राघोजी वाघ
आदिवासींचा राघोजी वाघ हा लागलाय गरजायला
माझ्या राघोजी भांगरेची कीर्ती लागली पसरायला|२|
स्वातंत्र्याची लागली ओढ
इंग्रजांची मोडली खोड
सिताराम कांबळेची लेखणी आता लागली तळपायला
माझ्या राघोजी भांगरेची कीर्ती लागली पसरायला|३|
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment