आदिवासी समाजासाठी क्रान्ति घडवली
माझ्या राघोजी भांगरेनं इंग्रज सत्ता हलवली | धृ |
देवगावाचा हा पुत्र
केले बंडकरी एकत्र
स्वातंत्र्याचा घेऊन मंत्र
लढला दिवस आणि रात्र
सावकार माजले होते त्यांना अद्दल घडवली
माझ्या राघोजी भांगरेनं इंग्रज सत्ता हलवली |१|
कळसुबाईच्या दारात
याने घेतली शपथ
गेला बाडगीच्या माचीत
आखला स्वातंत्र्याचा कट
रतनगडावर जाऊन पहिली चळवळ उभारली
माझ्या राघोजी भांगरेनं इंग्रज सत्ता हलवली |२|
भांगरे घराण्याचा हा वीर
जन्मताच होता शूर
कधी घेतली नाही माघार
इंग्रजांना केले हैराण
गनिमी कावा करून त्याने वचक बसवली
माझ्या राघोजी भांगरेनं इंग्रज सत्ता हलवली |३|
सिताराम कांबळेच लिखाण
राघोजी भांगरेचं हे गाणं
सह्याद्रीच्या मातीतून
हिरा गेला होता चमकून
राघोजीची कीर्ती साऱ्या जगात पसरली
माझ्या राघोजी भांगरेनं इंग्रज सत्ता हालावली |४|
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment