कळसुआई





____कळसुआई____


आमच्या आईची ओढ लागली भेटीची
खण नारळाने ओटी भरु कळसुआईची|ध्रु |

लई ग आवघड आहे आईचा तो घाट ग
झाडा झुडपातून जाते नागमोडी वाट ग
आता करा तयारी गड चढून जाण्याची
खण नारळाने ओटी भरू कळसुआईची |१|

त्या उंच गडावर आई बसली जाऊन ग
चला जाऊ दर्शनाला तीचा डोंगर चढून ग
आई गोड मानून घे सेवा भोळ्या भक्ताची
खण नाराळानं ओटी भरू कळसुआईची |२|

दुरून डोंगर आईचा दिसतोय हिरवागार ग
उंच गडावर आहे आमच्याआईचं देऊळ ग
या देउळानं शोभा वाढली आईच्या गडाची
खण नाराळानं ओटी भरू कळसुआईची |३|

आईच्या गडावर आहे वारा थंडगार ग
आहे तुझ्या भक्तांना तुझाच आधार ग
तुझा आशिर्वाद आमच्या राहुदे पाठीशी
खण नारळाने ओटी भरु कळसुआईची ४|


         सिताराम कांबळे

Comments