राघोजी एक आदर्श






_राघोजी एक आदर्श __


राघोजी भांगरे आदर्श आमचा
त्याच्याच विचाराने चालू आम्ही
त्याच्यापासून प्रेरणा घेऊन
आन्यायाविरुद्ध लढु आम्ही

राघोजीने पेरले बीज
त्याचा वटवृक्ष करू आम्ही
कितीही संकटे येऊद्या समोर
त्याचा सामना करू आम्ही

राघोजीचे थोर विचार
मनामनात पेरू आम्ही
घाबरणार नाही कधी कोणाला
राघोजीचे वंशज आम्ही

नाही थांबणार आता कुठे
चालत राहू पुढे पुढे
राघोजीचे रक्त आंगात
साक्षीला आहेत डोंगर कडे

राघोजीने रचला पाया
शिखर आम्हाला गाठायचं आहे
आपल्याला जे नडतील त्यांना
सह्याद्रीच्या मातीत गाडायचं आहे

              सिताराम कांबळे

Comments