सह्याद्रीचा वाघ राघोजी ....



________सह्याद्रीचा वाघ______


.सह्याद्रीच्या कडे कपारीत आवाज घुमला वाघाचा
म्हणून आम्ही जयघोष करतो राघोजीच्या नावाचा |ध्रु|

डोंगर दऱ्यात राहून त्याने सूत्र हलवली बंडाची
गनिमी कावा करून वाट लावली इंग्रज सैन्याची
राघोजी भांगरे भक्त होता आई काळसूबाईचा
म्हणून आम्ही जयघोष करतो राघोजीच्या नावाचा |२|

पळून गेले सावकार घरदाराला सोडून
मुजोर इंग्रज सत्तेचा कणा टाकला मोडून
अकोले तालुक्यात जन्म झालाय आमच्या वाघाचा
म्हणून आम्ही जयघोष करतो राघोजीच्या नावाचा |३|

बंड करायला आश्रय त्याने घेतला बाडगीच्या माचीचा
रतन गडावर जाऊन त्याने झेंडा रोवला बंडाचा
इंग्रज आणि सावकारांना धाक पोचला वाघाचा
म्हणून आम्ही जयघोष करतो राघोजीच्या नावाचा |४|

सिताराम कांबळे लिहितोय गाणं राघोजीच्या नावानं
बंडकऱ्यानी मिळून इंग्रज सैन्य केलं घायाळ
गोर गरीब जनतेचा तो कैवारी आदिवासींचा
म्हणून आम्ही जयघोष करतो राघोजिच्या नावाचा |५|


             सिताराम कांबळे

Comments