आदिवासी बांधव जगा हो





_____जागा हो______


एक नाही एकात बाप नाही लेकात
आशी झाली आपल्या समाजाची व्यथा
आदिवासी बांधवा तू जागा हो आता

किती तरी समस्या आपल्या पुढं
एक होऊनी तू त्यांच्याशी लढ
एकी शिवाय पर्याय नाही रे आता
आदिवासी बांधवा तू जागा हो आता

घुसखोरी बेकारी वाढली फार
हा तर आपल्या समाजाच्या मोठा आजार
याच्या वरती काही उपाय शोध रे आता
आदिवासी बांधवा तू जागा हो आता

आन्याय आत्याचार आता झालं रोजचं
अांधश्रधा लांब ठेऊ ठरवा आजच
आन्यायाला गाडाया उठ रे आता
आदिवासी बांधवा तू उठ रे आता

आमिषाला कोणाच्या बळी नको पडू
वेळ निघून गेल्यावर येईल रढू
स्वतःसाठी तरी डोळे उघड आता
आदिवासी बांधवा तू जागा हो आता


              सिताराम कांबळे

Comments