आमची हद्द (आरक्षण)

_____आमची हद्द____
         (आरक्षण)

.आम्ही आहोत आदिवासी
आदिवासी म्हणूनच जगणार
आमच्या हद्दीत कोणालाही
पाऊल नाही ठेऊन देणार

आमची हद्द कशी कोणती
हे आम्हाला माहीत आहे
आमच्या हद्दीत घुसण्याचा
कोणीही प्रयत्न करू नये

कोणीही केला प्रयत्न कधी
आमच्या हद्दीत घुसण्याचा
आदिवासींचा बसेल दणका
प्रश्नच नाही उठण्याचा

वाकड्या नजरेने पाहू नका
जशास तसे उत्तर देऊ
आदिवासींची जात दाखऊ
आल्या मार्गाने परत पाठऊ

आमचा नाद करायचा नाही
नादाला आमच्या लागायचं नाही
कारण आदिवासी देतील दणका
तो कोणालाही सोसायचा नाही

               सिताराम कांबळे

Comments