__ज्ञानाची रांगोळी__
आली क्रांतीची लाट
आता होईल पहाट
संपेल रात्रीचा अांधार
उजेड पडल दारात
संपेल आज्ञानाची रात
ज्ञान येईल घरात
आता बुडऊ आज्ञानाला
दूर खोल समुद्रात
आजवर आपण जगलो
आज्ञानाच्या आंधारात
आता गाडू आज्ञानाला
आपल्या काळया मातीत
खूप सोसलय आम्ही
खोट्या आज्ञानापायी
आता नाही सोसनार
काढू ज्ञानाची रांगोळी
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment