___राघोजीचा पोवाडा____
आधी नमन भीमा शंकराला
हारीचंद्राला, रतनगडाला
मग वंदितो कळसुआई
रंध्याची घोरपडाआई
भीमाशंकराची कळमजाई जी जी जी
करू वंदन क्रांती वीरांना
त्यांच्या त्यागाला,पराक्रमांना
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
देऊ क्रांतीवीरांना पहिला मान
राघोजी हा आदिवासींचा प्राण
गातो राघोजीचं गुणगान जी जी जी
आठराशे पाच सालाला
देवगावाला,नगर जिल्ह्याला
जन्म त्या राघोजीचा झाला
आदिवासी राजा जन्माला आला
चहूकडे आनंद झाला जी जी जी
धन्य धन्य ती रमाबाई, राघोजीची आई
जन्म तीने दिला राघोजीला
रामजी भांगरेला पुत्र झाला
सह्याद्रीचा वाघ जन्माला आला जी जी जी
जात होते दिवस भराभर
इंग्रज सावकार,माजले होते फार
समाज तेव्हा होता आडचनीत
इंग्रजांच्या राजवटीत
समाज नव्हता संघटित जी जी जी
समाजाला केले एकत्र
घेतली मेहनत,दिवस आणि रात्र
इंग्रज सरकार विरूध्द
त्याने पुकारले बंड
केले इंग्रजांना थंड जी जी जी
धन्य धन्य बाडगीची माची
जनु राजधानी, वीर राघोजीची
सूत्र इथून हालवली बंडाची
फौज उभारली बंडकर्यांची
केली दाणादाण इंग्रजांची जी जी जी
बारा वर्ष लढा त्याने दिला
नाही सापडला,इंग्रज सरकारला
इंग्रज झाले होते हैराण
राघोजीचा करत होते विचार
लावले बक्षीस पाच हजार जी जी जी
फितुरांनी केला मोठा घात
पंढरपुरात, चंद्रभागेच्या, नदीपात्रात
इंग्रजांनी घेरले राघोजीला
नेले ठाण्याच्या तुरुंगाला
नाही वकील मीळउ दिला जी जी जी
एकतर्फी खटला चालविला
फाशीची शिक्षा, दिली राघोजीला
त्याने ठणकावले इंग्रजांना
बंदुकीच्या गोळ्या घाला मला
तलवारीने उडवा शिराला
विरासारखं मरण द्या मला जी जी जी
आठाराशे आठेचाळीसला
दोन मेच्या काळया दिवसाला
फाशीची शिक्षा दिली त्याला
नाही डगमगला फाशीला
आपल्यासाठी देह त्यागीला जी जी जी
जरी प्राण गेला निघून
देह सोडून,आपल्यामधून
वीचार त्याचे नाही कधी मरणार
निरंतर जिवंतच राहणार
क्रांती ज्योत नाही कधी वीझनार जी जी जी
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment