शेतकरी



____शेेतकरी___


आरे शेतकरी दादा
किती करशील काम
कर थोडासा आराम
जरा जीरुदे रे घाम

थकले आसतील बैल
उभा कर औताला
पी रे घोटभर पाणी
कोरड पडली घशाला

गार झाडाची साऊली
जरा बस झाडाखाली
दिवस आला डोक्यावर
भाकर आणिल माऊली

झाली दुपारची वेळ
घे रे भाकर खाऊन
मग औत जुंपून
घे रे शेत नांगरून

आता येईल पाऊस
तुझी झाली मशागत
नको चिंता करू आता
पीक येईल जोरात


           सिताराम कांबळे

Comments