शेतकऱ्यांचे हाल


___शेतकऱ्याचे हाल__


कसा जगतोय शेतकरी
एकदा खेड्यात जाऊन बघा
राहायला नाही धड घर
झोपडीत त्याच्या राहून बघा

दिवसाही दिसतील चांदण्या
फक्त झोपडीत झोपून बघा
झोपडीत कसा पडतोय पाऊस
हे एकदा आनुभऊन बघा

पावसात तर त्याला झोपडीत
भांड्यांचं दुकान मांडावं लागतं
झोपायला नसते कोरडी जागा
रात्रभर बसून राहावं लागतं

कोरडवाहू शेती आमची
ती ही उंच डोंगरावरती 
पाऊस पडला तर पिकते शेती
नाहीतर झोपतो उपाशी पोटी

प्यायलाच नाही भेटत पाणी
तर शेतीला कुठून घालणार
माहीत नाही आमचे हे हाल
आजुन किती दिवस चालणार


              सिताराम कांबळे

Comments