______क्रांतीवीरांचा मळा_____
क्रांतीवीरांच्या इतिहासाचा दाबून टाकलाय गळा
सह्याद्रीच्या मातीत फुललाय क्रांतीवीरांचा मळा
देवगावात जन्माला आला राघोजी भांगरे
त्याला पाहून कुत्र्यावानी लांब पळत होते गोरे
शेवटपर्यंत लढला इंग्रजांचा चुकवून डोळा
सह्याद्रीच्या मातीत फुललाय क्रांतीवीरांचा मळा
गोविंद खाडे तो बारीचा किल्लेदार रतनगडाचा
किसन खाडे पुत्र त्याचा पती होता रुख्मीनीचा
मारून इंग्रजांना बदला कुंकाचा घेतला
सह्याद्रीच्या मातीत फुललाय क्रांतीवीरांचा मळा
वीर होनाजी केंगले जांभुरीचा ढाण्या वाघ
जुल्मी इंग्रज सत्तेला त्याने लावली होती आग
पाहून त्याला समोर इंग्रज सैन्य कापे चळचळा
सह्याद्रीच्या मातीत फुललाय क्रांती वीरांचा मळा
पाबे गावाचा तो वीर सत्तू मराडे त्याच नाव
त्या इंग्रज सत्तेवर त्याने आचुक केले घाव
इंग्रजांशी लढून इंग्रज सत्तेला घातला आळा
सह्याद्रीच्या मातीत फुललाय क्रांतीवीरांचा मळा
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment