____ध्येयाचं शिखर___
डोंगराच्या पायथ्याशीच
घुटमळतोय आपण
शिखर आपल्याला दिसणार कसे
एकमेकांना विचारतोय
वरपर्यंत जायचे कसे
सुरुवात केली नाही तर
माथ्यावर पोचणार कसे
वाट आवघड आहे की सोपी
हे आपल्याला कळणार कसे
फक्त विचार करत बसलो तर
काहीच होणार नाही
पायथ्याशी उभे राहून
शिखर दिसणार नाही
दगड धोंडे आडवे येतील
त्यांना आधी दूर करा
जय आदिवासी म्हणत
प्रवास आपला चालू करा
सुरुवात करून बघा
मार्ग आपोआप दिसेल
पुढे पुढे चालत गेल्यावर
ध्येयाचं शिखर दिसेल
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment