____एकीची मोळी____
मतभेदांची पेटवा होळी
एकजुटीची आवळा मोळी
जय आदिवासी देऊ आरोळी
एकमताची वाजऊ टाळी
एकीशिवाय पर्याय नाही
एकाने लढून चालणार नाही
कितीतरी आहेत समस्या
लढल्याशिवाय सुटणार नाही
सर्वच जमाती एकत्र या
एकतेची शपथ घ्या
आपसातील मतभेद विसरून
समाजासाठी एकत्र या
गट तट आता सोडा सारे
एकतेचे वाहू द्या वारे
यातच आपलं होईल भलं
भेटतील तेव्हा सुखाचे निवारे
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment