____धिक्कार___
लपून छपून घात करणारी
लांडग्यांची तुमची जात
आसेल तुमच्यात हिंमत
तर या समोर मैदानात
दाखवतो आम्ही तुम्हाला
आमची शुरवीरांची जात
तुमच्या करून चिंधड्या
घालू कुत्र्यांच्या मुखात
आमच्या देशावरची निष्ठा
नाही होणार कधी कमी
आमचा हा आनमोल देह
येईल देशासाठी कामी
वाट बघतोय आम्ही फक्त
आम्हाला आदेश भेटण्याची
वाट लाऊ तुमची आता
शपथ आमच्या बांधवांची
नाही सोडणार तुम्हाला
बदला घेणारच आम्ही
लपून बसले कुठेही
तरी शोधून काढू आम्ही
आभिमान आहे आम्हाला
आमच्या शूर जवानांचा
धिक्कार करतो आम्ही
कालच्या भ्याड हाल्याचा
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment