____विचार____
विचार तर सर्वच करतात
पण सकारात्मक करा
नकारात्मक विचारांना
देऊ नका कधीच थारा
भिन्न भिन्न आसली जरी
प्रत्येकाची विचारसरणी
चांगले विचार तारून नेतील
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
विचारांच्या शिदोरीवर
बरच काही आवलंबुन आसतं
माणसाचं व्यक्तिमत्व नेहमी
विचारातून दिसत आसतं
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
चांगल्या विचारांची जोड असावी
कितीही आल्या आडचनी तरी
मती आपली स्थिर आसावी
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment