शिरड

______शिरड______

पक्या तंटन्यान पक्या जाळी
तोडली फाट्यान बांधली मोळी
बळाच उचलली खांद्यावरीन
घराला पोचलो संध्याकाळी

बायकु दारात उभीच व्हती
माझीच वाट पहात व्हती
वाकत वाकत चाललो होतो
बायकु मला न्याहाळीत होती

लाडात येऊन म्हणली मला
इतका नका करू काम
म्हातारे व्हाशाल तुम्ही लवकर
मला तं फक्त तुमचाच आधार

उद्या आपण दोघही जाऊ
चाऱ्हाट दोऱ्या संगती नेऊ
वाळेल वाळेल फाट्या तोडू
घरी आपल्या घेऊन येऊ

झापाच्या पुढं मोकळ्या रानात
नाहीतं पढीच्या मागच्या भागात
फाट्या सगळी नेऊन ठिऊ
तिथंच चांगली शिरड लाऊ

        सिताराम कांबळे

Comments