प्रवाशांच दुर्दैव

____प्रवाशांचं दुर्दैव____

प्रशासनाचा निष्काळजीपणा
उठतोय लोकांच्या जीवावर
विचार करावा लागेल आता
जावं की नाही रेल्वे पुलावर

कधी होते चेंगरा चेंगरी
तर कधी कोसळतात पुल
प्रशासन मात्र खोटं सांगून
लोकांना बनवतय एप्रील फुल

जबादारी झटकून टाकून
सर्वच होतात बाजूला
आहे का कुठे वाली कोणी
मुंबईत प्रवाशांच्या जीवाला

त्याच चुका करून पुन्हा
आश्वासनांचा होतेय खैरात
प्रवाशांचा जीव स्वस्थ झालाय
काय चाललंय या राज्यात

इतका स्वस्थ झालाय का जीव
हाजारात त्याची किंमत लावतात
स्ट्रकचर ऑडिट करून सुध्दा
आशा घटना नेहमीच घडतात

आशा या आपघातांची
जबाबदारी कोण घेणार
की मुंबईतला रेल्वे प्रवासी
वर्षानुवर्षे असाच मरणार

        सिताराम कांबळे

Comments