१६०० महादेव कोळी

१६०० महादेव कोळ्यांचे थोडक्यात मनोगत

त्या मोघल सैन्याची फौज मोठी आसताना
नाही घाबरलो आम्ही मृत्यु समोर दिसताना

आम्ही दाखवली त्यांना आदिवासींची ताकत
करतो जवळ मरणाला नाही कुणापुढे वाकत
त्यांनी पकडले आम्हा बेसावध असताना
नाही घाबरलो आम्ही मृत्यू समोर दिसताना

नेले आम्हाला पकडून उंच शिवनेरीवर
त्यांनी घेतल्या हातात तलवारी धारदार
आमचे केले शिरकान हाती शस्त्र नसताना
नाही घाबरलो आम्ही मृत्यु समोर दिसताना

नाही आमचा इतिहास कोणी ठेवला लिहून
शोधा आपला इतिहास भूतकाळात जाऊन
आमची येईल आठवण किल्ला शिवनेरी चढताना
नाही घाबरलो आम्ही मृत्यु समोर दिसताना

              सिताराम कांबळे

Comments