___घराबाहेर पड___
संस्कृतीला सोडू नको
लढायला रडू नको
स्वताच्या स्वार्थासाठी
आपसात भांडू नको
आरक्षण धोक्यात
घुसतय का डोक्यात
रस्त्यावर येऊन तू
वाचव एका ठोक्यात
गुंग नुसता कामात
झोपू नको आरामात
आपल्या हक्कांसाठी
ये खुल्या मैदानात
आपल्या समाजासाठी
राहू नको कधी पाठी
वेळ तशी आली तर
वैऱ्याला दाखव काठी
आता भोळेपणा सोड
वैऱ्याचा माज मोड
पण त्यासाठी तू आधी
घरामधून बाहेर पड
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment