होळी

____होळी____

मतभेदांची पेटवा होळी
एकजुटीची वाजवा टाळी
एक मताने साजरी करू
आजची ही पवित्र होळी

मनभेद,मतभेद टाकू जाळून
आनंदाने घेऊ होळी खेळून
मतभेदाने नाही भलं कुणाचं
बघितलं आहे सर्वांनी जवळून

रंगीत रंगांची करू उधळण
राहील सर्वांना नेहमी आठवण
आपल्यातील वाईट विचारांचं
होळीमध्ये करू कायमचं दहन

सप्तरंगात रंगून जाऊ
इंद्रधनुष्यासम एक होऊ
होळीच्या या पवित्र दिनी
सर्वांना होळीच्या सुभेच्छा देऊ

सर्वांना होळीच्या हार्दिक
          शुभेच्छा

      सिताराम कांबळे

Comments