______कविता_____
कविता या फक्त कविताच नसतात
तर कवीच्या आंतर्मनातून बाहेर पडलेल्या माणसाच्या त्या भावना असतात
कविता सुखाच्या असतात
कविता दुःखाच्या असतात
कविता प्रेमाच्या असतात
तर कविता विरहाच्या पण असतात
कविता सामाजिक असतात
कविता राजकीय असतात
वेगवेगळे विषय शब्दबद्ध केलेले
कवीच्या मनातील खरे खुरे ते विचार असतात
कविता पानांना हलवतात
कविता फुलांना फुलवतात
रानातल्या वाहत्या पाण्याच्या संगीतात
रानातल्या पशुपक्षी आणि झाडांनाही नाचवतात
कविता मनात असते
कविता त्यागात असते
कविता रानात असते
कविता पाण्यात पण असते
कविता घरात असते
कविता दारात असते
कविता अंगणात असते
कविता शेतकऱ्याच्या वावरात पण असते
कविता सर्वत्र असते
फक्त ती समजून घेण्याची
दृष्टी असावी लागते
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment