___जातिवादाचा बळी___
जातीपातीच्या काळ्या पट्टया
बांधून आपल्या डोळ्यावर
खोट्या प्रतिष्ठेच्या या सुऱ्या
फिरू लागल्या गळ्यावर
कितीतरी निरपराध जीवांचे
बळी दररोज जात आहेत
आपण वाट बघत बसतो
उद्याचे बळी किती आहेत
दोन दिवस करतो निषेध
तिसऱ्या दिवशी विसरून जातो
याचाच फायदा घेऊन शत्रू
पुढच्या बळीची तयारी करतो
किती दिवस आपलंच मरण
आपणच असं बघत बसायचं
कधीतरी आपणच पुढे येऊन
मरणाला नाही का थांबवायचं
खूप सोसलंय आजपर्यंत
आता तरी मौन सोडलं पाहिजे
जातिवादाच्या विषारी सापाचा
फना ठेचून काढला पाहिजे
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment