____धग____
सूर्य तापला तापला
ओकु लागला हो आग
कसं जगावं जीवांनी
तूच मला आता सांग
नाही पियाला हो पाणी
नाही दिसत हो चारा
नाही दिसत साउली
कुठं दिसना निवारा
पानं गळुन हो गेली
झाली बोडकी ही झाडं
गेले तापून दगड
लाल झाले हे पहाड
उष्णतेची आम्हा नाही
आता सोसत ही धग
कसं चालावं वाटेने
होते अंगाची हो आग
वाट पाहे पावसाची
प्राणी पक्षी झाडं पानं
आता झालं आवघड
पाण्याविना हि जगणं
सिताराम कांबळे
गारवाडी ता.अकोले जि. अहमदनगर
मो.८६५२७५९९२८
Comments
Post a Comment