____निसर्ग राजा___
आम्ही राजे या जंगलाचे
आमचे काळीज वाघाचे
दऱ्या खोऱ्यात राहून
रक्षण करतो निसर्गाचे
झाडा झुडपामध्ये गाव
नाही कसला भेदभाव
येथे आनंदाने नांदतो
आमचा निसर्गच देव
प्राणी,पक्षी,झाडे,वेली
सारे आमचेच संगती
यांच्यासंगे राहातो आम्ही
आकाशाच्या छताखाली
झाडा झुडपांनी नटलेला
दिसे डोंगर हिरवागार
याच्यासारखा देखावा
दुसरा नाही पृथ्वीवर
दिसे जंगल घनदाट
त्यात वळणाची ती वाट
जाते घेऊन आम्हाला
बघण्या निसर्गाचा थाट
प्राणी पक्षी आनंदाने
रोज नाचती रानात
रोज बसावे वाटते
निसर्गाच्या सानिध्यात
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment