जातबळी

____जातबळी____

रडायचं नाही लढायचं
मागं नाही आता सरायचं
वैऱ्याला शोधुन काढायचं
जिवंत मातीत गाडायचं

खूप झाले अन्याय,अत्याचार
आता यांचा घेऊ समाचार
आपल्या नादाला लागतानी
हाजार वेळा करतील विचार

आता नको आजून बळी
निष्पाप जीव जात आहेत
बळी देणारे आजून सुध्दा
बाहेर मोकाट फिरत आहेत

माहीत नाही कधी भेटतील
नरबळी देणारे हे गुन्हेगार
कितीही नाही म्हणले तरी
तेच आहेत याला जबाबदार

बळी दिला तिघींनी मिळून
ती आमची बहीण होती
माहीत नाही किती दिवस
यांचा त्रास सहन करीत होती

तिच्या साठी मैदानात उतरून
आपण आता लढलं पाहिजे
तिच्या रूपाने आजून जाणारे
बळी आपण वाचवले पाहिजेत

          सिताराम कांबळे

Comments