_____जय बिरसा___
कोणी म्हणती धरती आबा
कोणी म्हणे तुला भगवान
कोणीही असला तरीही
बिरसा होतास तू महान
महान तुझे विचार होते
लढलास आमच्यासाठी
नेहमीच राहील नाव तुझे
प्रत्येक आदिवासींच्या ओठी
करून मोठे उलगुलान तू
लढत राहिला इंग्रजासी
म्हणून नेहमी संगती होते
आपले धाडसी आदिवासी
आमच्या न्याय हक्कासाठी
नेहमीच तू लढत राहिला
तुझ्या रूपाने लढाऊ योद्धा
इतिहासात आम्ही पाहिला
अन्याय अत्याचार आजही
बसलेत आमच्या छातीवर
जातीपातीच्या भेदभावांनी
समाज झालाय हा बेजार
आजही गरज आहे आम्हाला
बिरसा तुझ्या महान विचारांची
मार्ग चुकून आम्ही करतोय
वैचारिक गुलामी दुसऱ्याची
योग्य मार्ग दाखवायला आम्हाला
बिरसा येशील का पुन्हा तू
या साध्याभोळ्या समाजासाठी
जन्म घेशील का पुन्हा तू
जन्म घेशील का पुन्हा तू
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment