_____रानमेवा_____
आंबं लागलं पिकायला
साका लागल्या गळायला
थोडा दाबला जरी आंबा
रस लागतोय गळायला
पिकल्या करवंदाच्या जाळी
करवंद झाली काळी काळी
पोरं सोरं रानात जाऊन
आणतात दुपारच्या वेळी
आवळं पिकली झाडाला
उंबर पिकले खोडाला
पुऱ्या वर्षाचा रानमेवा
आहे मागच्या आडवाला
मस्त पिकलेत झाडं
नका करू त्यांची तोड
नाहीतर पडेल दुष्काळ
तेव्हा उघडतील डोळं
झाडे लावा झाडे जगवा
तरच मिळेल रानमेवा
सारे जपून ठेऊ या
निसर्गाचा अनमोल ठेवा
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment