___पहिला पाऊस___
विजांचा कडकडाट
ढगांचा गडगडाट
आला वाजत गाजत
पाऊस आपल्या दारात
ढोल ढगांचा वाजला
उजेड विजांनी पाडला
वरात पावसाची निघाली
वरुणराजा नवरा झाला
याचं करू या स्वागत
नाचू गाऊ आनंदात
बळीराजा खूष झाला
पीक येईल जोरात
नजर होती आकाशात
पाऊस लपला ढगात
त्याला भेटला गार वारा
आला घेऊन शेतात
होते सर्व चिंतातुर
नव्हते पिण्यासाठी पाणी
तहान भागवण्यासाठी
आला धावून देवावानी
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment