____निसर्ग___
निसर्गच देव माझा
करतो मी त्याचीच पूजा
नाही मानत दुसर्या देवाला
मी आहे जंगलचा राजा
आमचं वास्तव्य जंगलात
निसर्गाच्या सानिध्यात
प्राणी पक्षी खेळतात
येऊन आमच्या अंगणात
आमचा निसर्गच आहे
आमची धन संपत्ती
विकासाच्या नावाखाली
येऊ लागली आपत्ती
जंगलतोड झाली सुरु
प्राणी पक्षी लागले मरू
हत्यार घेऊन हातात
रक्षण निसर्गाचे करू
सिताराम कांबळे
(८६५२७५९९२८ )
Comments
Post a Comment