आम्ही आदिवासी

___आम्ही आदिवासी____

अभिमान आहे आम्हाला
आम्ही आदिवासी असल्याचा
राहातो आम्ही रानावनात
आधार आम्हाला निसर्गाचा

डोंगर दऱ्याच जग आमचे
जंगलच वैभव आमचे
डोंगरावरच आमची शेती
पवित्र मानतो डोंगरमाती

जंगल हीच आमची संपत्ती
डोंगरामध्येच आमची वस्ती
अभिमानाने सांगतो आम्ही
निसर्गच देव आमच्यासाठी

त्याचीच कृपा आम्हावरी
तोच आम्हाला देतो भाकरी
त्याच्यवरच जीवन आमचे
आम्ही हाडाचे शेतकरी

जंगलात राहातो आम्ही
आहोत आम्ही समाधानी
शहरांपेक्षा गाव बरा
गावच आमची राजधानी


        सिताराम कांबळे

Comments