_____वृक्षारोपण_____
झाडे नाही तर पाऊस पडना
वेळेवर दर्शन त्याचं घडना
ऐकू येईना ढगांची गर्जना
पाहिजे तसा पाऊस येईना
सर्वत्र पडू लागला दुष्काळ
गेला निघून सुगीचा काळ
केलं हाताने आपलं वाटोळं
आता तरी बघ उघडून डोळं
दूषित झाले पर्यावरण
माणूसच आहे याला कारण
परिणाम झाले विलक्षण
आनले जवळ आपलेच मरण
केली भरपूर वृक्षतोड
काही झाडांचा झाला बिमोड
नाही लावले एकही झाड
जगणं आता झाले आवघड
झाडे लावा झाडे जगवा
सर्वांना मिळेल शुद्ध हवा
पाऊसही पडेल वेळेवर
एकदा झाडे लावून बघा
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment