_____सुवर्ण कन्या____
हिमा खरच तू
हिमालयायेवढी मोठी झालीस
देशाबरोबरच आमचीही मान
हिमालयाइतकीच उंच केलीस
हिमा तुझं आर्ध मानधन तू
पुरग्रस्थाना दिलस
इतरांसारखं तू तुझं
घर का नाही भरलंस
अभिमान आहे सर्वांनाच तुझा
तू खरच खूप मोठी झालीस
पण आदिवासींत जन्म घेतला
हि एकच चूक तू केलीस
दुसऱ्या समाजाची आसतीतर
रात्रंदिवस टीव्हीवर दिसली असती
पेपरची पानं सर्व
तुझ्याच फोटोंनी भरली असती
राजकारण्यांची रांग
तुझ्या दारात लागली असती
तुझे अभिनंदन करण्यासाठी
सेलिब्रिटींची फौज उतरली असती
आज वरवर कौतुक होईलही तुझे
उद्या सर्वच विसरून जातील
तू केलेली ही कामगिरी
लपवण्याचेही प्रयत्न होतील
आदिवासी कन्या शोभतेस तू
झेप तुझी वाघिणीची
आमर इतिहास रचलास तू
शान आहेस आदिवासींची
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment